दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरामधील असणारी वाहतूक कोंडीची समस्येच्याबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ज्या नागरिकांना समस्या आहेत त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता फलटण नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह नगरपरिषद व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.