दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची सभा सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी सभागृह, चौथा मजला, जिल्हा परिषद, सातारा येथे होणार असल्याची माहिती जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहअध्यक्षतेखाली व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिशा समितीची सभा संपन्न होणार आहे.