दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक प्रतिबंधक व कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.
या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बोगस वैद्यकीय व्यवसायीकांनी औषधे दिल्यामुळे रुग्णांचे शारिरीक नुकसान होऊ शकते. काही रुग्णांना कायमचे दिव्यांगत्व येते. तर अनेकदा रुग्णांना प्राण गमवावा लागतो. तरी शहरी व ग्रामीण भागातील बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या यावेळी केल्या.