कृषीकन्याची सोनवडी सुपे येथे भेट


दैनिक स्थैर्य । 6 जुलै 2025 । बारामती । अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी आलेल्या कृषीकन्यांनी सोनवडी सुपे गावचा हुबेहूब नकाशा चक्क रांगोळीतून रेखाटल्याने गावकर्‍यांनी त्यांचे कौतुक केले.

बारामती कृषी महाविद्यालयाच्या किर्ती ढवणे, मानसी धुमाळ, वैष्णवी घोडके, दर्शना गुरव, अनुजा माने, रेश्मा सातपुते, नेहा वाघचवरे या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत सोनवडी सुपे येथे तीन महिने मुक्कामी आहेत.

कृषीकन्यांनी गावात असणार्‍या विविध मृदा जमा करून गावातील मृदेचे प्रकार नकाशातून दर्शविले. तसेच त्यांनी विविध फळे व धान्ये यांच्या सहाय्याने गावातील पीक पद्धत नकाशातून दाखवली.

कृषीकन्यांनी शाळेच्या प्रांगणात रांगोळीच्या माध्यमातून गावाचा नकाशा काढला ते पाहून शाळेतील मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. या कृषी कन्यांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, एस. व्ही. बुरुंगळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गोंडगे, केंद्रप्रमुख बाळासाहेब नामदास, आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!