
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ पर्यंत आयोजित केलेल्या एसएससी बोर्ड परीक्षा सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल ज्युनियर कॉलेज, तरडगाव येथे घेतली जाणार आहे. या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. २६६७३ ते २६९०९ एकूण २३७ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना बोर्डाने अधिकृत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शालेय गणवेशात ओळखपत्र रिसीट व लेखन साहित्य घेऊन ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहण्याची निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये भ्रमणध्वनी, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक, घड्याळ, स्मार्ट वॉच पॉकेट, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक साधने बाळगण्यास बोर्डाने सक्त मनाई केली आहे.
उशिरा येणार्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व निर्भय व तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालिका सौ. काकडे एस. जी. मॅडम तसेच उपकेंद्र संचालक अहिवळे सर, त्याचप्रमाणे प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. क्षीरसागर सर यांनी केले आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी दक्षता समिती, विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.