मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण येथे १२ वी कला शाखेच्या बोर्ड परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण येथे इ. १२ वीच्या (कला शाखा ) बोर्ड परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एच. एस. सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ ची मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण केंद्र क्र. ०१०२ येथे कला शाखेची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होत आहे. त्यानुसार मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण येथे कला शाखेच्या बैठक क्रमांक द०६५०७० ते द०६५४८३ या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण मेन बिल्डिंग विभागामध्ये ही बैठक व्यवस्था केली जाणार आहे. १२ वी कला शाखेच्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी.

परीक्षेला येताना विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळख पत्र (आयडेंटी कार्ड ) व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात परीक्षा वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने / उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई केली गेली आहे. तसेच विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण केंद्राचे केंद्रप्रमुख प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर, उपप्राचार्य सौ.कदम मॅडम यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!