दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । बारामती । बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथे जे विद्यार्थी इयत्ता पहिली साठी नवीन दाखल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी महेश गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शबाना शेख, यावेळी उपस्थित होते वसंतनगर भागांमधून शाळा पूर्वतयारीच्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर जे कोरोणाच्या सावटामुळे गेली दोन वर्ष इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित मुले होती त्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट वाटप करण्यात आले मान्यवरांचे यावेळी मनोगत झाले.तसेच आज 20 विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व तसेच मेळाव्यातील काहीच कृती उपक्रम यांचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सौ वर्षा साळवे व पुनम कांबळे , नेहा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे लेझीम तसेच ढोल वाजवून मुलांचे स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ कापसे यांच्यासह सौ शुभदा कुलकर्णी सौ वर्षा साळवे , पुनम कांबळे श्री बापू नरुटे मुख्याध्यापक सौ.निर्मला शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास कंकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पुनम कांबळे यांनी केले यावेळी बोलताना शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कापसे म्हणाले की कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांना शाळेत येता न आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे राहून गेले होते म्हणून शासनाच्या वतीने घेतलेला हा कार्यक्रम छान असून विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले.