स्थैर्य ,कराड दि. २४ (प्रमोद गरगटे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमित घेतली जाणारी शहर समितीची बैठक येथिल यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे संपन्न झाली.मीच माझा रक्षक अभियान अंतर्गत या वेळी विशेषतः कराडमधिल सर्व डॉक्टर्स व आशा वर्कर्स यांना निमंत्रित करण्यात आले होते.
बैठकीसाठी तहसिलदार अमरदिप वाकडे ,पोलीस वरिष्ठ निरीक्षक बी.आर.पाटील, आय एम ए संस्थेचे डॉक्टर वैभव चव्हाण, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
कराडमधे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर बऱ्याच प्रमाणात आहेत परंतू समितीच्या बैठकीसाठी त्यांची उपस्थिती मात्र अगदीच नगण्य होती या बाबत नगरसेवक सौरभ पाटील यांनी खेद व्यक्त केला. कराड बाहेरील लोकांनी किरकोळ आजारासाठी कराडमधे न येता जवळ असलेल्या दवाखान्यात उपचार घ्यावेत जेणेकरुन कराडमधिल दवाखान्यातील गर्दी टाळली जाईल अशी सूचना डॉ. राहूल फासे यांनी मांडली.
मंडईसाठी नागरिक फार गर्दी करतात सोशल डिस्टंसीगचे भान नसते यासाठी रविवार व गुरुवारचे बाजार बंद केले आहेत असे आण्णा पावसकर यांनी सांगितले मीच माझा रक्षक हे ब्रिद लक्षात ठेवून नागरिकांनी स्वताःहा च स्वताःहा चे रक्षण करावे .या वेळी अनेक डॉक्टरांनी काही अडचणी व सूचना मांडल्या. बैठकीत आशा वर्कर्स यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नगरसेवक विजय वाटेगांवकर, हणमंतराव पवार, आण्णा पावसकर, सौरभ पाटील तात्या, फारुक पटवेगार यांनी अनेक विषयांवर सूचना मांडल्या. म न से चे सागर बर्गे यांनी कलेक्टर साहेब यांच्या आदेशानूसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधिल ओपन जिम व व्यायामासाठी खुले करावे अशी सुचना मांडली. सामाजिक कार्यकर्ते विवेक ढापरे यांनी कोरोना बाधितांची आकडेवारी दर्शवून आगामी पावसाळी वातावरणामुळे कोरोना बाधित वाढल्यास उपाययोजना करणेबाबत विषय मांडला त्यावर आय एम ए चे डॉ. वैभव चव्हाण यांनी भविष्यात सर्वांनी काळजी घेतली तर रुग्ण वाढणार नाहीत व जर वाढले तर सध्या कृष्णा हॉस्पिटल व संह्याद्री हॉस्पिटल बरोबर नऊ मोठ्या हॉस्पिटलमधे सर्व सुविधांसह तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले. बैठकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकही सहकार्य करत असल्याचे मत सौ. रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केले.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पुढील बैठकीसाठी जास्तीत जास्त डॉक्टरांनी उपस्थित रहावे अशी आशा व्यक्त केली.