
दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । सातारा । गोवर रुबेलात 0 ते 5 वर्ष वयोगटामधील वंचित राहिलेल्या बालकांना विशेष लसीकरण मोहिमेद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये दि.15 ते 25 डिसेंबर 2022 व दि.15 ते 25 जानेवारी 2023 मध्ये विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील वैदयकिय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचे गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वैशाली बडदे यांनी दिली.
मोहिमेपूर्वी गोवर रुबेला लसीकरण न झालेल्या वंचित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटामधील गोवर रुबेला लसीकरण न झालेल्या वंचित बालकांना डोस देण्यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वैशाली बडदे यांनी केले आहे.