मयुरी कदमची कृषी अधिकारीपदी निवड




स्थैर्य, फलटण, दि. २७ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास कदम यांची पुतणी कु. मयुरी राजेंद्र कदम हिची अखिल भारतीय पातळीवरील बँकिंग परीक्षेतून बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

 मयुरी कदम हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या गिरवी येथील शाळेते, माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज, कोल्हापूर येथे झाले.

मयुरी कदमच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!