
स्थैर्य, बारामती, दि. १२ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघाच्या (तलाठी) बारामती तालुका शाखेच्या अध्यक्षपदी मयुरेश सुरेश वाघमोडे यांची, तर सचिवपदी आदेश रविंद्र निकम यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या वार्षिक सभेत ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून भाग्यश्री माळी व नीलम देशमुख, कार्याध्यक्ष म्हणून दिगंबर घोरपडे व पुनम गावडे, तर खजिनदार म्हणून गोरक्षनाथ इंगळे यांची निवड झाली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून विनोद धापटे आणि गजानन पारवे काम पाहणार आहेत.
महसूल अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी सोडवणे, शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाकडे मांडण्यासाठी पाठपुरावा करणे यावर भर दिला जाईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष मयुरेश वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.

