दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । खटाव । वडूज, ता. खटाव येथील वीर जवान मयूर जयंत यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडूज येथील एस टी डेपोच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आर.एम.जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
यावेळी माजी सैनिक, लोक प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व वडूज पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.