फलटण तालुक्यातील पहिले कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मयुर अलगुडे याचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास ५३ मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. हे आरक्षण मिळविण्यासाठी मराठा कुणबी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. राज्यात जवळपास ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार फलटण तालुक्यातील मयुर अलगुडे यास पहिले कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा फलटणचे विक्रमसिंह शितोळे यांच्या हस्ते मयुर अलगुडे याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी फलटण तालुका केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष रणजित कदम, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट संघटनेचे सदस्य राहुल मोहिते व तालुका सदस्य विश्वजीत कदम, अतुल मोरे, ओमकार भोसले उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!