दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । दहा दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी सातारा पालिका सज्ज झाली असून, पालिकेने मूर्ती विसर्जनासाठी चार कृत्रीम तळ्यांची उभारणी केली आहे. गुरुवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, पाणीपुरवठा सभापती सिता हादगे यांनी या तळ्यांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
सातारा पालिकेकडून दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी बुधवार नाका, दगडी शाळा, हुतात्मा स्मारक व कल्याणी शाळा येथे कृत्रीम तळ्याची उभारणी केली जाते. यंदाही या तळ्यांची उभारणी करून ती मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह सभापतींनी तळी, त्यातील पाणीसाठा, वीज व्यवस्था, मचान, सुरक्षारक्षक, बॅरिकेटिंग अशा कामांचा आढावा घेऊन अधिकारी व कर्मचाºयांना विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्याच्या सूचना केल्या.