दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । मुंबई । मेहेम स्टुडिओज या एएए गेम्ससाठी भारतातील पहिल्या स्टुडिओने भारतामधील त्यांचे पहिले टायटल ‘अंडरवर्ल्ड गँग वॉर्स’ (यूजीडब्ल्यू) या बॅटल रॉयल गेमची घोषणा केली आहे. मेहेम स्टुडिओजने मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन शोच्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठ्या गेमचे अनावरण केले आहे. या ड्रोन शोच्या माध्यमातून स्टुडिओने गेम लोगोचे अनावरण केले आणि क्यूआर कोडची देखील निर्मिती केली, जो प्रेक्षकांना गेमच्या टीझरकडे घेऊन जातो.
‘अंडरवर्ल्ड गँग वॉर्स’ दोन टोळींच्या शत्रुत्वाच्या अवतीभोवती फिरते. भारतामध्ये रूजलेले पात्र व कथानकासह गेम भारताच्या कथांमधून प्रेरित काही रोमांचक पात्रांसह उत्साहवर्धक अनुभवाची खात्री देतो. भारतीय कथानकामध्ये स्थित स्थळे, टोळ्या, आयकॉन्स पहिल्यांदाच एएए गेममधील भारतीय संदर्भाला सादर करतात. गेमची थीम, शस्त्रे व नकाशे गेमर्सना अद्वितीय अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
यूजीडब्ल्यूमधील गेमप्ले रोमांचक अवस्थेत पोहोचतो जेव्हा पश्चिमेकडील अंडरडॉग टोळीला त्यांच्या प्रतिस्पर्धी शहरी टोळीकडून पूर्वेकडील प्रांताचा ताबा मिळवायचा आहे. अस्सल अनुभव देण्यासाठी गेममध्ये वर्णन करण्यात आलेले प्रत्येक प्रांत भारतातील वास्तविक स्थळाशी मिळतेजुळते आहे, मग ते कोळशाच्या खाणी असो किंवा सदनिका संकुल असो. या गेममध्ये किल्ला, स्टेशन, स्टेडियम व रेस-कोर्स सारखी प्रख्यात स्थळे देखील आहेत. या गेमसाठी पूर्व-नोंदणी २२ मेपासून सुरू होईल.
मेहेम स्टुडिओजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओजस विपत म्हणाले, “आम्हाला पहिला बॅटल रॉयल टायटल घेऊन येण्याचा आनंद होत आहे, जो गेमर्ससाठी सर्वात संबंधित कथानक सादर करण्याचे वचन देतो. यूजीडब्ल्यूची अद्वितीय स्थळे व उच्च विश्वास, सर्वोत्तम ग्राफिक्स निश्चितच बॅटल रॉयल खेळाडूंना सर्वोत्तम अनुभव देतील. आम्ही जगासमोर भारताच्या काही अद्वितीय कथांसह ब्लॉकबस्टर गेम सादर करण्यास उत्सुक आहोत.”
या कार्यक्रमाला तन्मय भट, मोर्टल, स्काऊट व डायनामो गेमिंग यासारखे आघाडीचे गेमिंग प्रभावक व उत्साही देखील उपस्थित होते.