
दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२२ । फलटण । या वर्षीचा डिसेंबर महिना या वेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. कोरोना नंतर अध्यात्मिक कार्यक्रम दोन वर्षाच्या कालावधीनंतर सगळीकडे जोरात सुरू झाले. आता ह्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा भागवत सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते. त्याच्यानंतर श्री समर्थांच्या चरण पादुका आपल्याकडे आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन आता श्री समर्थांच्या चरण पादुका पुढे मार्गस्थ होत आहेत. आगामी काळामध्ये त्यांचे आशीर्वाद आपल्यावर कायमच राहणार आहेत, असे मत श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील श्री संत गोविंदकाका उपळेकर महाराज मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामी यांचा प्रचार व प्रसार दौरा मुक्कामी होता. त्याच्या समारोप कार्यक्रमात श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी, श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रानडे, खजिनदार हेमंत रानडे, विश्वस्त शंतनू रुद्रभटे, अनिल तेली, जेष्ठ मार्गदर्शक मधुकर कुंभार, फलटण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सागर सस्ते यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी फलटण सुचवलं गेलं आहे. भूषण स्वामींनी इथे येऊन मीटिंग घेतली त्याच्याप्रमाणे प्रचार दौऱ्याचा नियोजन झालं आणि आपल्या सगळ्यांना सेवेची संधी मिळाली आहे. जवळजवळ दहा-बारा वर्षानंतर ही संधी मिळाली आणि भूषण स्वामींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करणारे की आगामी काळामध्ये जास्त कालावधी जाऊन न देता फलटणचा विचार जितका तितक्या जास्त वेळा करता येईल किंवा लवकर करता येईल आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी. फलटणला जी संत परंपरा किंवा एक अध्यात्मिक वातावरण फलटणमध्ये आहे; आणि त्याचमुळे इथे येणारी व्यक्ती ही अध्यात्मिक प्रवृत्तीची थोडीफार सुद्धा का होईना त्यांच्या जाणीव निर्माण होते. त्या दृष्टीने सगळ्यांचीच वाटचाल सुरू झालेली असते. फलटणला श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुका दौरा हा आमच्या सगळ्यांच्या आध्यात्मिक प्रगतीला हातभार वाढवला आहे, असे मत श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड आयोजित श्री समर्थ चरण पादुका प्रचार दौरा 2022 आणि या प्रचार दौऱ्यामधील आमचं सांगली, कराड सोलापूर नंतरचा चौथा ठिकाण हे फलटण होत. अर्थातच संतांच्या या भूमीमध्ये समर्थांच्या चरण पादुका या 24 डिसेंबरला या ठिकाणी आल्या आणि उद्या 29 डिसेंबरला या समर्थांच्या चरणपादुका पुढच्या मुक्कामाला म्हणजेच पुण्याला रवाना होणार आहेत. फलटण आणि संतांच्या या एकूणच विचारधारेचे खऱ्या अर्थाने बीज केंद्र हे फलटण आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. या ठिकाणी गोविंद काका महाराज आहेत; आणि पुण्याईने श्री संत ज्ञानेश्वर महाराज दरवर्षी या ठिकाणी मुक्कामाला असतात. फलटणमध्ये पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष समर्थ या ठिकाणी वास्तव्याला आहेत. आमचीही तीच धारणा आहे की सज्जनगडाचे ते धारणा आहे की समर्थांच्या चरणपादुका त्याच ठिकाणी जातात जिथे समर्थांना दर्शन देण्याची इच्छा असते. संत त्याच ठिकाणी जातात, तिथे त्यांचे भक्त त्यांचे वाट बघत असतात. त्यांच्याच घरातून भिक्षा घेतात ज्यांच्याकडून ती घेण्याची इच्छा समर्थन आहे. त्यांच्याच घरी पादुकांच्या रूपाने जातात ज्यांच्याकडून पूजा करून घ्यायची समर्थांना आणि संतांना इच्छा आहे. अशा सगळ्या भक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी म्हणून समर्थांच्या चरण पादुका या आपल्या मुक्कामी फलटण मुक्कामी आल्या आणि आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे की, आपण समर्थांच्या या झोळीमध्ये आपल्या घरातलं काही धन स्वरूपात धान्य स्वरूपात आपण समर्थांच्या झोळीमध्ये अर्पण करता, असे मत श्री समर्थ रामदास स्वामी घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांनी व्यक्त केले.
या भिक्षेचा विनियोग हा सज्जनगडावरती जो या नंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये समर्थांचा दासनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या दासनवमी उत्सवातील प्रचंड अन्नदान जे आहे आणि वर्षभर येणाऱ्या लाखो भाविकांच्या विनामूल्य अन्नदानासाठी या भिक्षेचा विनियोग केला जातो. जे धन स्वरूपात प्राप्त होतो; त्याचाही विनियोग हा गडावरच्या विविध उपाय योजना आहेत. नूतन वास्तूचं बांधकाम असेल ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचा संवर्धन असेल समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून विविध कार्य संस्थांच्या माध्यमातून केला जातो, असे मत श्री समर्थ रामदास स्वामी घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांनी व्यक्त केले.
रघुवीर समर्थ नावाचा मासिक संस्थांच्या माध्यमातून आज जवळपास 5000 लोकांपर्यंत हे मासिक पोहचत आहे. विविध उपक्रम आहेत काही सामाजिक उपक्रम संस्थांच्या माध्यमातून होतात जसं की काही शाळांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो. काही व्यायामशाळा मदत करण्याचा प्रयत्न करतो. काही मेडिकलचे कॅम्प आपण या सज्जनगडच्या भागांमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. दर गुरुवारी सज्जनगडावरती एक डॉक्टर आणि त्याची वैद्यकीय सेवा संस्थांनच्या मार्फत विनामूल्य भाविक भक्तांसाठी तिथल्या स्थानिक रहिवासासाठी आपण उपलब्ध करून दिली आहे. विविध उपक्रम संस्थांनचे आहेत विविध उपक्रमासाठी म्हणून हा निधी या ठिकाणी उपयोगात आणला जातो. अर्थात संस्थांनचे हे कार्य हे संस्थांनच एकटाच नाहीये. त्याच्यात आपल्या सगळ्या हजारो भाविक भक्तांचा सहभाग नक्कीच आहे. आपण जे देता तेच गडावरून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. जे धनस्वरूपात धान्य स्वरूपात येतो त्याचाच प्रसाद दाखवा अन्नदात्यांचे त्याच्यात सहभागात हातभार आहेत; आणि त्यांच्याविषयी परंतु संस्थान अत्यंत कृतज्ञ आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जे प्राप्त होत त्याचाही नक्कीच विनियोग या गडाच्या विविध सेवा कार्यामध्ये होणार आहे. फलटणच्या आपल्या प्रत्येक घरातून गेल्या पाच दिवसांमध्ये जे प्राप्त झाले हे खऱ्या अर्थाने समर्थ म्हणायचे की, कितीही आणला तरी त्याच्यातला एक मूठभर घे आणि प्रत्येकाच्या घरातून जेव्हा मूठभर धान्य येईल तेव्हा या मुठभर धान्यातून हे सर्वही उत्सव महोत्सव साजरे करावेत. कारण ते प्रत्येकाला आपले वाटावे एका कोणाच्यातरी व्यक्तीकडून ते घेऊन समर्थांनी शक्य होतं परंतु समर्थांचं मत समर्थांचं म्हणणं असं होतं की माझ्या प्रत्येक घरातून प्रत्येक कुटुंबातून एखादं धान्य मूठभर धान्य जेव्हा येईल तेव्हा त्या प्रत्येक धान्याचे किंमत आणि त्याची एक भक्ती त्याची एक निष्ठा या कार्यामध्ये समर्पित होईल. भक्ती भावनेने समर्पित झालेल्या या श्रद्धेची आहे. आणि ती अनुभवण्यासाठी आपण नक्की सज्जनगडावरती या आपण पुन्हा पुन्हा या आपण अर्पण केलेलं जे आहे; जे विनियोग सज्जनगड करण्याचा प्रयत्न करतो ते पुन्हा स्वीकारण्यासाठी पुन्हा आपण सज्जनगडावरती अवश्य या जरूर यावे, असे मत श्री समर्थ रामदास स्वामी घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांनी व्यक्त केले.
श्री सज्जनगडावरती पाणी योजनेच्या माध्यमातून गडावरती पाणी उपलब्ध आहे. त्या बैठकीसाठी म्हणून आम्ही सज्जनगडहून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्याकडे हा विषय मांडला होता. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व ना. अजितदादा पवार त्या सगळ्या सरकारी माध्यमातून ती योजना गडावरती आज परिपूर्ण झाली. आणि त्याच्या उद्घाटनासाठी माननीय रामराजे साहेब गडावरती आले होते. गडावरती प्रत्येक जण जो येतो त्याची तहान भागवण्याचे काम आज फलटण करत आहेत; हे अभिमानाने मला इथे सांगावसं वाटतं आणि हे एक नाही दोन नाही पुढच्या शंभर वर्षाची काळजी फलटण आणि फलटणच्या या राजघराण्यांनी श्री सज्जनगड संस्थानासाठी घेतली आहे. गडाची परंपरा आहे की जे आमच्या झोळीमध्ये प्राप्त झालेला आहे, त्याचा हिशोब त्याचं सांगणं तुमच्यासमोर मांडायचं आणि मग आमचा पुढचा प्रवास पुढच्या प्रवासाला निघायचं. त्याचप्रमाणे फलटणमध्ये या 24 तारखेपासून ते आज 28 तारखेपर्यंत समर्थांच्या चरणपादुका या ठिकाणी आहेत. त्या पादुकांच्या समोर झोळीमध्ये व मुक्कामाच्या ठिकाणी इथे आमचं कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये पावत्या पावत्यांच्या स्वरूपात असेल दानापेटीच्या स्वरूपात अर्पण केलेला धान्य, धन स्वरूपात असेल जे काही प्राप्त झालं त्याचा हिशोब आपल्यासमोर सांगायचा मांडायचा आणि पुढच्या प्रवासाला निघायचं त्यानुसार 25 किलोच एक होतं. जे सगळं अर्पण केलं आपण ते 25 किलो याप्रमाणे 190 पोती धान्य या चार दिवसांमध्ये समर्थांच्या झोळीमध्ये आपण अर्पण केलं. आणि एवढंच नाही तर जे धनस्वरूपात म्हणजे पैशाच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपात इथे विविध पद्धतीने पादुकांसमोर झोळीमध्ये पावत्यांच्या रुपात आणि पादुका पूजनाच्या प्रसंगात जे जे काही आपण अर्पण केलं. त्याची जी किंमत आहे त्याची जी रक्कम आहे ती रुपये दोन लाख 81 हजार एवढी रक्कम आपण या समर्थांच्या झोळीत अर्पण केली आहे, असे मत श्री समर्थ रामदास स्वामी घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांनी व्यक्त केले.
आपण अर्पण केलंय त्या अनुषंगाने समर्थांचे अखंड कृपाशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या घरावरती, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर ते राहो ही समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे. तिथे आपण म्हणू की समर्थ जेव्हा येतात समर्थ जेव्हा या सगळ्या गोष्टी स्वीकारतात, हे देण्यासाठीच येतात संतांचं कामच आहे. की जे आपण करू शकतो त्याचे पेक्षाही वेगळं काम जे दान संत देऊ शकतात, जे दान देण्याचं काम संत करतात ते तुमच्या दृष्टीने तुमच्यावरती कृपेचा आशीर्वाद तुमच्या आयुष्याचा कल्याण होण्याच्या दृष्टीने जो महत्त्वाचा भाग आहे. ते संत या ठिकाणी करत असतात ते नक्कीच करतील या ठिकाणी संतभूमी मध्ये आपण वास्तव्याला आहोत आपल्याकडून जे काही करणं शक्य आहे ते संतांसाठी आपण करू ते वारसा ती परंपरा या गावांमध्ये लाभलेली आहे त्या दृष्टीने समर्थांचे ही उत्तम उत्तम आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबावरती प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती राहोत, असे मत श्री समर्थ रामदास स्वामी घराण्याचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांनी व्यक्त केले.
गेल्या आठवडा भर ह्या प्रचार दौऱ्यामुळे फलटण शहराचे वातावरण बदलले. फलटण शहरात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. आपण सज्जनगड वर जाऊन जरी दर्शन घेऊ शकलो नाही तरी ह्या प्रचार दौऱ्यामुळे आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांचे दर्शन झालेले आहे. ह्या दौऱ्यामध्ये भिक्षा फेरी ही महत्वाची आहे. त्याला फलटण मध्ये उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. आपल्याला त्याग करणे गरजेचे आहे, ही संतांची शिकवण आहे. आपल्याला स्वतःकडील काही तरी दान करणे म्हणजे त्याग करणे गरजेचे आहे. ह्या फलटण शहरामध्ये कोणतेही अध्यात्मिक कार्य हाती घेतले तर कोणतीही कमतरता भासत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात फलटण सारखे शांत शहर सापडत नाही. फलटणमध्ये जी मंदिरे उभी आहेत त्या मध्ये फलटणच्या राजघराण्याचा खूप मोठा हात आहे. आता असलेली पिढी सुद्धा हा वारसा चालवत आहे. अध्यात्मिक कामामध्ये फलटणमध्ये कधीही कमतरता पडत नाही. देवाच्या व गुरूंच्या कृपेमुळेच अध्यात्मिक काम पुढे जाता येते, असे मत जेष्ठ मार्गदर्शक मधुकर कुंभार यांनी व्यक्त केले.
श्री संत गोविंदकाका उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रानडे, खजिनदार हेमंत रानडे, विश्वस्त बाळकृष्ण कणसे, अनिल तेली, महेश बारसावडे, शंतनू रुद्रभटे, प्रवीण रणवरे यांचा यथोचित सन्मान श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने भूषण महारुद्र स्वामी यांनी केला.
श्री समर्थ रामदास स्वामी महाराज प्रचार व प्रसार दौऱ्यासाठी फलटण येथे स्थानिक समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये जेष्ठ मार्गदर्शक मधुकर कुंभार, ऍड. मिलिंद लाटकर, अनिरुद्ध रानडे, ऍड. सागर सस्ते, सोपानराव कदम, महेश सुतार, प्रसाद शेवडे, आशुतोष वाघ, केदार पेटकर, धीरज पेटकर, योगेश फौजदार यांचा यथोचित सन्मान श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने भूषण महारुद्र स्वामी यांनी केला.