दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । मुंबई । परस्परांशी संवाद साधत तसेच समन्वयपूर्वक काम करता यावे यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांचा जागतिक पातळीवरील आघाडीचा ब्रँड मॅक्सहबने आज भारतात डिस्प्ले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये ३ नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान समाधान म्हणून लहान ते मध्यम आकाराच्या कॉन्फरन्स हॉलना या उत्पादनांचा फायदा होईल. यासोबतच क्लासरूम स्मार्ट बनवण्यातही याची मदत होईल. यामुळे मीटिंग आणि शैक्षणिक सत्रांची परिणामकारकता आणि उत्पादकता वाढेल. नवीन सादर करण्यात आलेल्या श्रेणीमध्ये रॅप्टर सीरिज एलईडी व्हिडीओ वॉल, नॉन-टच डिस्प्लेज आणि ३६० डिग्री व्हिडीओ कॅमेरा कॉन्फरन्सिंग कॅमेरा युसी एम४० यांचा समावेश आहे.