क्लासरूमला अधिक स्मार्ट बनविणारी उत्पादने मॅक्सहबने सादर केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । सहयोगात्मक कम्युनिकेशन, संवादात्मक क्लासरूम आणि कॉर्पोरेट डिलिव्हरी सोल्युशन्स प्रस्तुत करणारी कंपनी मॅक्सहब इन्फोकॉम’२०२२ इंडियामध्ये सहभागी झाली आहे. बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या प्रदर्शनात मॅक्सहबने २२०” एलईडी वॉल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिव्हायसेस आदींचा समावेश असलेल्या आपल्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड क्लासरूम सोल्युशन्सचा पोर्टफोलिओ प्रदर्शित केला आहे. मॅक्सहबची ही सोल्युशन्स स्मार्ट क्लासरूमला अजून जास्त स्मार्ट बनवतात. यामध्ये अशा तंत्रज्ञानाचा समावेश आहे जे रिटेल, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, कॉन्फरन्सिंग इत्यादी ठिकाणी वापरण्यासाठी आदर्श आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मॅक्सहबने शिक्षण तंत्रज्ञानातील अनेक उत्पादनांची शृंखला याठिकाणी प्रस्तुत केली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रणालीसाठी भारतातील पहिली परिवर्तनकारी आणि आपल्या प्रकारची अनोखी उत्पादने याठिकाणी प्रदर्शित केली आहेत, जी अधिक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी फ्यूचरिस्टिक क्लासरूम बनवण्यात मदत करतील. ब्लॅकबोर्ड्ससोबत ८६” पॅनल, ट्रॅकिंग कॅमेरा, ओम्नी- डायरेक्शनल मायक्रोफोन, स्टीरियो स्पीकर्स आणि रेकॉर्डिंग डिव्हाईस याठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. रेकॉर्डिंग आणि थेट प्रसारण क्षमतांसह संपूर्ण स्मार्ट क्लासरूम सोल्युशन्स शिक्षण क्षेत्रामध्ये वास्तविक बदल घडवून आणतील.

इन्फोकॉम’२०२२ इंडियामध्ये एक आकर्षक २२०” एलईडी वॉल प्रदर्शित करण्यात आली आहे, जी या संपूर्ण शोचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. नुकतेच लॉन्च करण्यात आलेली ७५” आणि ९८” एलईडी नॉन-टच डिस्प्ले सोल्युशन्स देखील कॉर्पोरेट आणि एअरपोर्ट लँडस्केपमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत. याठिकाणी ग्राहक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिव्हायसेसची संपूर्ण अपडेटेड श्रेणी अनुभवू शकतात.

कार्यकारी संचालक (सीव्हीटीई इंडिया अँड सार्क रिजन) श्री. अविनाश जोहरी यांनी सांगितले, “इन्फोकॉम’२०२२ इंडियामध्ये भाग घेताना आम्हाला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे. या प्रदर्शनामुळे आमची कोलॅबोरेशन आणि कम्युनिकेशन सोल्युशन्सना प्रदर्शित करण्यासाठी मंच उपलब्ध झाला आहे आणि आम्हाला अशा हितधारकांसोबत संपर्क साधण्याची संधी दिली आहे ज्यांना एकात्मिक उत्पादनांची आवश्यकता आहे आणि जे प्रत्यक्ष उत्पादनांचा वास्तविक अनुभव घेऊ इच्छितात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवू शकतील असे नवे तंत्रज्ञान शोधून आणि समजून घेण्यात शिक्षकांची मदत करणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थी देखील तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊ शकतील आणि त्यांचा वापर आपल्या व्यावसायिक जीवनात करू शकतील. आम्हाला पक्की खात्री आहे की, सोल्युशन्सची गुणवत्ता व्यवसायांचे संचालन अजून जास्त सक्षम बनवण्यात मदत करेल.”


Back to top button
Don`t copy text!