दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी उन्नतीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यापैकी फलटण तालुक्यात जास्त प्रमाणात ही कर्ज प्रकरण मंजूर झाली आहेत. या कर्ज प्रकरणांसाठी व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे व कर्ज प्रकरण मंजुरीसाठीचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक फलटण शहराध्यक्ष जमशेदभाई पठाण यांनी केला. याचा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायवाढीसाठी आर्थिक लाभ होणार आहे. याबद्दल कर्ज प्रकरण मंजूर झालेल्या व्यावसायधारकांनी जमशेदभाई पठाण यांचे आभार मानले आहेत.
व्यावसायिकांना कर्ज मंजुरीचे पत्र सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे व्यवस्थापक उदय कांबळे यांच्या हस्ते सातारा जिल्हा कार्यालयात देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक फलटण शहराध्यक्ष जमशेदभाई पठाण, सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे कारकून इक्बालभाई शिकलगार व सातारा जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात या महामंडळाकडून १८ प्रकरणे मंजूर झाली आहेत. यापूर्वी फलटण शहरातून फक्त दहा प्रकरणे मंजूर झाली होती. आता प्रत्येकी ३ लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे.