‘मातोश्री’ला उडवण्याची धमकी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला उडवण्याची दुबईवरुन धमकी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.६: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला उडवण्याची धमकी मिळाली आहे. दुबईहून मोस्ट वॉन्टेंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने फोन करुम धमकी दिल्याची माहिती आहे. यानंतर मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर एखच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना पुढील सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, दाऊद इब्राहिमवर मुंबईतील 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!