सातारा शहरातील अट्टल मोबाईल चोरास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । सातारा । सातार शहर परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांनी गजाआड केला असून त्याच्याकडून 50 मोबाईल हस्तगत केले असून याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. विकास अशोक खंडागळे वय 29, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा अशी संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 09 जानेवारी रोजी रात्री 11.30 ते दि. 10 जानेवारी सकाळी 07 च्या दरम्यान शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजीनगर सातारा येथे नवीन बांधकाम साईटवर पत्र्याच्या उघड्या शेडमधून एकूण 10 हजारांचे मोबाईल चोरी गेले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहर व परिसरात वारंवार घडणाार्‍या मोबाईल चोर्‍यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर होते.

त्यादृष्टीने शहर पो. ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. आरोपी अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करुनदेखील माहीती प्राप्त होत नव्हती. अशात गुन्हे प्रकटीकरण पथकास गोपनीय माहिती मिळाली की, शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजी नगर सातारा येथे नविन बांधकाम सुरू असले साईटवरील चोरीस गेलेले मोबाईल हे प्रतापसिंहनगर सातारा येथील एका इसमाने चोरले आहेत. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ प्रतापसिंहनगर येथून दि. 01 जुलै रोजी सायंकाळी संशयितास ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने शिवराज पेट्रोल पंपाशेजारी संभाजी नगर सातारा येथे बांधकामाचे ठिकाणी पत्र्याचे शेडमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक 5 हजार किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपीस अटक करुन तो कोठडीत असताना कसून चौकशी केली असता त्याने आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 50 मोबाईल हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत 5 लाख 700 रुपये आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोहवा. गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!