वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, २४ : बेंचमार्क निर्देशांक आजच्या व्यापारी सत्रात उच्चांकी स्थितीत स्थिरावले. वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी दिसून आल्याने आजच्या सत्राचे नेतृत्व याच क्षेत्राने केले. निफ्टी ०.८३% किंवा ९४.८५ अंकांनी वाढला व तो ११,४०० च्या पातळीपुढे म्हणजेच ११,४६६.४५ अंकांवर स्थिरावला. तर दुसरीकडे सेन्सेक्सने ०.९५% किंवा ३६४.३६ अंकांची वृद्धी घेतली व तो ३८,७९९.०८ अंकांवर थांबला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १५०० शेअर्समध्ये नफा दिसून आला तर ११०९ शेअर्स घसरले तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. झी एंटरटेनमेंट (४.७६%), कोटक महिंद्रा बँक (३.४९%), इंडसइंड बँक (३.३३%), बजाज फायनान्स (३.०६%) आणि एचडीएफसी बँक (२.६९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर पॉवर ग्रिड कॉर्प (२.०१%), अदानी पोर्ट्स (१.०९%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.१८%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (१.०७%), ग्रासिम इंडस्ट्रीज (१.०५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

आयटी आणि फार्मा क्षेत्रात आज घसरण दिसून आली. तर बँकिंग, ऑटो, मेटल आणि एफएमसीजी सेक्टर्स हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप हे ०.४४% नी तर बीएसई स्मॉलकॅप हे १.५७% नी वधारले.

झी एंटरटेनमेंट : दिग्गज गुंतवणूकदार मनीष चोखानी, जे कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत, त्यांनी झी एंटरटेनमेंटमधील शेअर्स खरेदी केले. त्यानंतर झी एंटरटेनमेंटचे शेअर्स ४.७६%नी वाढले व त्यांनी २०१.२० रुपयांवर व्यापार केला.

ओरिएंट बेल लिमिटेड : प्रसिद्ध गुंतवणूकदार पोरींजू वेलियाथ यांनी शुक्रवारी कंपनीत ९१.८७ रुपये किंमतीचे अतिरिक्त ८०,००० शेअर्स अधिग्रहित केले. कंपनीचे शेअर्स ६.२६% नी वाढले व त्यांनी ९८.४० रुपयांवर व्यापार केला.

फ्युचर रिटेल लिमिटेड : फ्यूचर रिटेलचे स्टॉक्स ५.३१% नी घसरले व थकबाकी भरण्यात कंपनी अपयशी झाल्यानंतर कंपनीने ११५.८५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीला कूपन धारकांना १४ दशलक्ष डॉलर्स किंवा १०५ कोटी रुपयांची परतफेड करायची होती. कंपनीच्या सार्वजनिक अहवालांनुसार, सध्या कंपनीचे १२,७७८ कोटी रुपयांचे एकत्रित कर्ज आहे.

हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड :कंपनीने अॅमेझॉन वेब सिरिज कॉन्टॅक्ट केंद्रावर सहभागाची घोषणा केली. सध्याच्या कॉन्टॅक्ट सेंटर सोल्युशनमध्ये वाढ बौद्धिक वाढ करण्यासाठी ग्राहकांची याद्वारे मदत केली जाईल. कंपनीचे शेअर्स २.३२% नी वाढले व त्यांनी ७३३.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : भारतीय रुपयाने उच्चांकी नफा कमावला. देशांतर्गत इक्विटी मार्केट सकारात्मक राहिल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.३१ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने : आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतीत कमकुवतपणा आल्याने आज एमसीएक्सवर पिवळ्या धातूचे दर घसरले. तसेच सोन्याच्या किंमती घसरण्यात डॉलरचीही मदत झाली.

जागतिक बाजार : अमेरिकी अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आकडेवारीने लक्ष वेधून घेतल्याने नॅसडॅकने उच्चांकी पातळी गाठली. कंपनीच्या शेअर्सनी ०.४२ टक्क्यांची वृद्धी घेतली. निक्केई २२५ चे शेअर्स ०.२८% नी वाढले तर हँगसँगचे शेअर्स १.७४% नी वधारले. युरोपियन मार्केटनेदेखील आजच्या सत्रात हिरव्या रंगात व्यापार केला. एफटीएसई १०० चे शेअर्स १.७२% नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.०८% नी वधारले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!