श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने फलटण येथे भव्य रक्तदान शिबीर


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । फलटण । येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन व गुढीपाडव्याच्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात सहभागी होवून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी केले आहे.

शनिवार, दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6:00 या वेळेत श्री स्वामी समर्त सेवा मंडळ, गजानन चौक, अहिल्यानगर, फलटण येथे सदरचे शिबीर पार पडणार असून या शिबीरास प्रसिद्ध मराठी वेबसिरीज ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम भरत शिंदे, रामदास जगताप, सुभाषराव मदने व संपूर्ण टिम उपस्थित राहणार आहे. तसेच रक्तदात्यांना एक रोप व आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे. इच्छुक रक्तदात्यांना अधिक माहितीसाठी संजय चोरमले 9405590976, सौरभ बिचुकले 9637294247, कुणाल वाघ 7887838970, आशिष काटे 9665509835 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रविवार, दि.3 एप्रिल 2022 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स.6 ते 10 धार्मिक कार्यक्रम, दु.12:15 वा. महाआरती, दु.12:30 ते 4:00 महाप्रसाद, दु.4:00 ते सायं.6:30 भजन, सायं.7:30 वा. आरती व रात्री 9:00 नंतर हरीजागर आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा तसेच महाप्रसादाकरिता अन्नदान सेेवा करावी, असे मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!