फलटणच्या महात्मा फुले चौकातील मसाला दुधाचा स्टॉल ठरतोय मार्गदर्शक; सस्तेवाडीच्या वैभव सस्ते यांचा उपक्रम अनुकरणीय


दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
सस्तेवाडीचे वैभव सस्ते यांनी फलटणच्या महात्मा फुले चौकात नवीनच मसाला दूध विकण्याचा सुरू केलेला व्यवसाय हा व्यवसायाची संधी शोधणार्‍या तरुणांना अनुकरणीय असाच आहे.

त्याची माहिती अशी, आज महात्मा फुले चौकातून जात असताना नेहमी ज्या ठिकाणी “शांतिदूतांच्या” हातगाड्या लागलेल्या असतात त्या ठिकाणी, “आपल्या” एका माणसाचा व्यवसाय दिसला. उत्सुकता म्हणून त्याला भेटायला गेलो ते सस्तेवाडीचे वैभव सस्ते निघाले. वडापावपासून गुटख्यापर्यंतच्या सर्व हातगाड्या फलटणमध्ये दिसतात, पण रस्त्यावर मसाला दूध मिळत असलेले आजपर्यंत पाहायला मिळालं नव्हतं(किमान मागच्या दहा वर्षात). आपल्यातल्या एका माणसाने ही संधी ओळखून त्यादृष्टीने केलेला हा प्रयत्न खरंच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. आपल्या ग्रुपमधील अनेकजण व्यवसाय करण्याचा विचार करत असतील, त्यांना हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्यासारखे आहे. आपण प्रत्येकाने त्यांना अवश्य भेट द्या. प्रोत्साहन द्या तसेच अशा मोक्याच्या जागा आपल्या व्यवसायासाठी निवडा आणि तिथे तळ ठोकून बसून व्यवसाय करायला सुरुवात करा.


Back to top button
Don`t copy text!