
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राजाळे, तालुका फलटण गावचे हद्दीतून राहत्या घरातून पत्नी सौ. पूनम उमेश चोपडे (वय ३२) दि. १८ फेब्रुवारीच्या रात्री १० ते १९ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कोणासही काहीएक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. तसेच ती अद्यापपर्यंत घरी परत आली नसल्याची फिर्याद पती उमेश भानुदास चोपडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
हरवलेल्या सौ.पूनम उमेश चोपडे या रंगाने गोर्या, नाक सरळ, अंगाने जाड, उंची ५ फूट, चेहरा उभा, अंगात केशरी रंगाची साडी व काळे रंगाचा ब्लाउज असा घातलेला हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या मराठी भाषा बोलते अशा आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून अधिक तपास पो.हवा. अडसूळ करत आहेत.