यूएस फेड धोरणाबाबतच्या बैठकीपूर्वी बाजारपेठा सावध राहतील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । मुंबई । सोमवारी, स्पॉट गोल्डने  अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह धोरणाच्या बैठकीपूर्वी गेल्या आठवड्यापासून झालेल्या काही तोट्यामागे बाजार बंद होण्यापूर्वी ०.५५ टक्क्यांची वाढ नोंद केली. तसेच, साथ रोगाचा व्यापक प्रसार आणि मंदीनंतर चीनमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात आले आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित मालमत्ता म्हणून गणल्या जाणा-या सोन्यातील घसरण काहीअंशी रोखली गेली. सोन्यातील नफा मर्यादित होता. कारण मालमत्ता विकासक एव्हरग्रांडेच्या पतस्थितीच्या चिंतेमुळे सुरक्षित समजल्या जाणा-या डॉलरकडे आकर्षण वाढले. ज्याचा डॉलर निर्धारीत वस्तुंच्या किंमतीवर दबाव आला.

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे पण लावण्यापूर्वी अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीपेक्षा गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती दबावाखाली राहिल्या. पुढील काही महिन्यांत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकांच्या भूमिकेच्या अनिश्चितता बाजार सावध राहिल आणि सोन्याच्या किंमती स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत अमेरिकेच्या फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी केलेली कोणतीही आक्रमक टिप्पणी सोन्याची किंमतीत वाढ नोंदवू शकतील.

कच्चे तेल: सोमवारी डब्ल्यूटीआय क्रूड 2.3 टक्क्यांहून अधिक घसरून प्रति बॅरल 70.3 डॉलरवर बंद झाले. अमेरिकन डॉलरच्या मजबुत स्थितीनंतर तेलाने गेल्या आठवड्यापासून बहुतेक नफा पलटवला आहे. तसेच, चिनी मालमत्ता विकासक एव्हरग्रांडेच्या पतस्थितीच्या मुद्द्यांमुळे बाजारपेठांमध्ये भीतीची लाट पसरली. ज्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आणि तेलाच्या किंमतीत घट झाली.

इडा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे मेक्सिकोच्या आखातातील काही तेल उत्पादक युनिट्स या वर्षाच्या अखेरीस ऑफलाइन राहतील, अशी शक्यता अहवालात सुचवल्यानंतर तेलाच्या किंमतीत झालेली घसरण काही अंशी रोखल्या गेली. अमेरिकेच्या मेक्सिकोच्या आखातात दोन चक्रीवादळे आणि वाढत्या जागतिक मागणीवर पण लावल्यानंतर उत्पादन क्षमता हळूहळू पुन्हा सुरू झाल्याने गेल्या आठवड्यात तेलाच्या किंमतींना  आधार मिळाला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह धोरण बैठकीपूर्वी बाजारपेठा सावध राहतील अशी अपेक्षा आहे जी आजपासून पुढील काही महिन्यांत त्यांच्या आर्थिक भूमिकेवरील संकेतांवर आधारीत असेल.


Back to top button
Don`t copy text!