स्थैर्य, मुंबई, 17 : भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवरील वाढत्या तणावामुळे भारतीय बाजाराने आजच्या व्यापार सत्रात अस्थिरता अनुभवली. निफ्टी ०.३३% किंवा ३२.८५ अंकांनी घसरून ९९०० अंकांच्या पातळीखाली आला. निफ्टी ९८८१.१५ अकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.२९% किंवा ९७.३० अंकांनी घटला व ३३५०७.९२ अंकांवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
आजच्या सत्रात १११६ शेअर्स घसरले, १५२ शेअर्सचे मूल्य कायम राहिले तर १४०९ शेअर्सच्या मूल्यात वाढ दिसून आली. मारुती सुझूकी (४.०५%), भारती एअरटेल (३.४१%), अॅक्सिस बँक (१.८५%), विप्रो (२.४५%) आणि इंडसइंड बँक (१७०%) हे आजच्या टॉप मार्केट गेनर्समध्ये सहभागी होते. तर भारती इन्फ्राटेल (४.४९%), पॉवर ग्रिड (२.१५%), कोटक महिंद्रा बँक (२.२९%), आयटीसी (२.१९%) आणि श्री सिमेंट (१९१%) हे बाजारातील प्रमुख लूझर्समध्ये समाविष्ट झाले. ऑटो, आयटी, फार्मा सेक्टर्सने विक्री अनुभवली तर मेटल, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रही नकारात्मक स्थितीत दिसून आले.
आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या. यलो मेटलने बीजिंगमधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे तटस्थ भूमिका दर्शवली. तसेच अमेरिकी डॉलरमुळे त्यावरील लाभांनाही मर्यादा आल्या.
अमेरिकेतील क्रूड आणि फ्युएल यादीत वाढ झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आज घसरल्या. कोव्हिड-१९च्या नव्या रुग्णांच्या संभाव्य लाटेमुळे कच्च्या तेलाचा ज्यादा पुरवठा होण्याची शक्यता आहे.
युरोपीयन बाजाराने सकारात्मक ट्रेंड दर्शवत आज वृद्धी घेतली. कोव्हिडमुळे विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला आधार मिळण्याच्या तीव्र आशेमुळे बाजारात सकारात्मक प्रवाह दिसून आला. एफटीएसई १०० चे स्टॉक्स ०.६९% नी तर एफटीएसई एमआयबीचे स्टॉक्स ०.१८% नी वाढले. अमेरिकेची विक्री वाढल्याने डॉलरचे मूल्य स्थिर राहिले. नॅसडॅकचे शेअर्स १.७५% नी तर हँगसँगचे शेअर्स ०.५६% नी वाढले. तर निक्केई २२५ चे शेअर्स ०.५६ % नी घसरले.