
दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । बारामती । महाराष्ट्र राज्य सरकारच्या महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये कर्मचारी संघटनांनी बारामती मध्ये (गुरुवार 23 डिसेम्बर 2022) मोर्चाचे आयोजन केला होते.
अदाणी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित कुरुन गडगंज १००० कोटी रूपया पेक्षा जास्त महसुल मिळवणारा प्रदेश उदा: नवी मुम्बई,पनवेल,उरण, ठाणे,मुलुंड,भांडूप,तळोजा क्षेत्रातील हे असा ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीला हस्तांतरीत सध्या व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून असा परवाना मागितला आहे.खाजगी कार्पोरेट घराण्याने पुर्णतः औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसंकीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला.
महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व अत्यंत कार्यक्षम ठरलेली कंपनी असून केंद्र सरकारने कंपनीच्या एकूण कार्यक्षमता व कारभाराचा विचार करुन अनेक पारितोषिके जाहीर केली आहेत.ज्या कंपनीने २०२१-२२ सालात १३५ कोटी रुपयाचा नफा कमाविला अश्या कंपनीचे महसुलाचा उच्चांक असलेली वा ज्या ठिकाणी कृषी ग्राहकच नाही असा प्रदेश खाजगीकरणा करीता निवडला आहे. या कृतीला समिती मधिल सर्व संघटनांना तिव्र विरोध आहे.
महावितरण कंपनी मिळवत असताना नफा राज्यांच्या हिताकरीता,विकासारीता वापरला जातो तर अदाजी सेवा करण्याकरीता नव्हे तर जास्तीत जास्त नफा कमावण्याचा उदेशाने या क्षेत्रात येत आहे.या पद्धतीने खाजगीकरण झाले तर कृषी ग्राहकांना जी स्वस्त दरात वीज देतो ती क्रॉस सबसिडी कंदाचीच्या भागातील शुन्य झाल्यामुळे त्याचा वीजदर (Tarff) कर परिणाम होऊन वीजेचे दर वाढतील व शेतकरी,घरगुती ग्राहक,दुर्बल घटकांना स्वस्त दरात वीज देणे अशक्य होईल.
खाजगीकरणा सोबतच कृषी कंपनी स्थापनेला विरोध,महानिर्मितीचे लघुजल विद्युत खाजगीकरणाच्या भोवऱ्यात असताना
तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार व प्रशासनाने घेतला तर त्या निर्णयाच्या विरोधात संघर्ष समिती मध्ये सर्व सहभागी संघटनानी खालील आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बारामती मधील विविध महावितरणच्या संघटनांनी आंदोलन केले व मोर्चा प्रांत कार्यालयावर काढून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले याप्रसंगी संयुक्त कृती समिती बारामती चे दत्तात्रय माहूरकर सचिव विद्युत क्षेत्र, तांत्रिक कामगार युनियन महावितरण बारामती परिमंडळ कल्याण धुमाळ सचिव पुणे प्रादेशिक, ज्ञानेश्वर सावंत, धनाजी तावरे, जैनुद्दीन अतार, राजेंद्र देहाडे, संतोष पवार राजेंद्र झिंजाडे.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन धनंजय गावडे, देवकाते, सूळ, चांगण. इंजिनियर्स असोसिएशन रवींद्र चौधरी, पांढरे अधिकारी संघटना दामोदरे , महाडिक वर्कर्स फेडरेशन नितीन वाघ कामगार महासंघ सुरेश देवकर इंटक संघटना, श्रीधर कांबळे मागासवर्गीय संघटना आदी कामगार प्रतिनिधी उपस्तित होते.