सातार्‍यात मराठी भाषा पंधरवड्याचा आज प्रारंभ


स्थैर्य, 26 फेब्रुवारी, सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे 15 वे वर्ष असून शुक्रवार 27 फेब्रुवारी ते सोमवार 16 मार्च 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ शुक्रवार दि.27 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

पत्रकात, सातार्‍यात साहित्यिक चळवळीत महत्वाचे योगदान देणार्‍या मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने 15 वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने राज्यातील मराठी पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाचे 15 वर्ष असून त्याचा प्रारंभ शुक्रवार मराठी राजभाषा दिन म्हणजेच दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पाठक हॉल येथे होणार आहे.

मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटनानिमित्त ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधूर प्रसिध्द कवी, लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांचे ’नारायण सुर्वे- माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ड.डी.जी. बनकर, सातारा पालिकेचे नियोजन, विकास सभापती अशोक शेडगे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मारााठी भाषा पंधरवड्यांच्या या सर्व कार्यक्रमांना साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सदस्य किशोर बेडकिहाळ, डॉ.उमेश करंबेळकर, वजीर नदाफ, आर.डी.पाटील, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ.अश्विनी जठार, निमंत्रित सदस्य डॉ.राजेंद्र माने यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!