मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन सप्ताहास सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे मराठी भाषा संवर्धन सप्ताहास शनिवार, दि. ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास इयत्ता सहावीतील ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना मुधोजी हायस्कूलमधील ग्रंथालयातील प्रत्येकी एक पुस्तक देण्यात आले व विद्यार्थांना त्या पुस्तकांमधील आवडलेल्या भागावर थोडक्यात माहिती लिहायला सांगितली. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यामध्ये उपक्रमामध्ये सर्वात चांगल्या मराठी लेखन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस देण्याची योजना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांच्या मध्यमातून राबविण्यात आली आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे यांची होती. मुधोजी हायस्कूल ग्रंथालयाच्या व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मुधोजी हायस्कूल ग्रंथालय प्रमुख ए. बडवे व मराठी विभागाच्या प्रमुख एल. एच. अनपट यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला.

यावेळी बोलताना मराठी भाषा विभागप्रमुख एल. एच. अनपट म्हणाल्या की, मराठी भाषा संवर्धनामुळे विद्यार्थ्यांना म्हणी, सुविचार, वाक्यप्रचार इत्यादीमध्ये सुधारणा होते आणि लेखन कौशल्य वाढते. या मराठी भाषा संवर्धन उपक्रमाचे फायदे व कशासाठी हा मराठी भाषा पंधरवडा राबविला जातो हे विद्यार्थांना सांगितले.

त्यानंतर ग्रंथपाल सौ. ए. बडवे यांनी मराठी भाषा दिन साजरा करण्याचा हेतू सांगताना कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचे नाव आकाशगंगे मधील एक तार्‍याला दिले गेले आहे. ध्रुव तार्‍यासारखे असं साहित्य निर्माण करणारे कवी कुसुमाग्रज होते. तसेच नवीन पिढीलासुध्दा एमपीएससी परीक्षा देताना मराठी भाषा, त्यातील व्याकरण यांचा उपयोग होतो. त्यासाठी मराठी भाषा संवर्धनाची गरज आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता ही मूळ संस्कृत भाषेत असल्याने सामान्य लोकांना समजण्यास अवघड होती, ती सोप्या भाषेत सर्वांना समजावी म्हणून ज्ञानेश्वरांनी ती मराठी भाषेत लिहिली, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व सांगून पुस्तके देण्यात आली .

कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी लतिका अनपट, एस. एस. सस्ते, घोरपडे एस. डी., नाईक निंबाळकर ए. ए., रसाळ एस. एस., नाईक निंबाळकर पी. एस., बुचडे एल. यु., घोलप एस. एस., टी.व्ही. शिंदे, कदम एस. बी., अहिवळे एस., स्टाफ सेक्रेटरी नितीन जगताप, डी.एन. जाधव, रामदास माळवे, अमोल नाळे, अमोल सपाटे, तडवी एस. यांनी या उपक्रमास सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!