मराठी विश्वकोशाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२३ । सातारा । महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेला मराठी विश्वकोश हा स्तुत्य उपक्रम असून याचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

राज्यपाल रमेश बैस यांनी वाई, सातारा येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वाईचे प्रभारी तहसिलदार वृषाली जायगुडे, वाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशचे सहायक सचिव डॉ. शामकांत बा. देवरे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाची प्रशंसा करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, भारतात मी खूप ठिकाणी भेटी दिल्या पण अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेला हा पहिलाच स्तुत्य उपक्रम आहे, याचे समाधान वाटते. मराठी विश्वकोशाकडे खूप मोठी ग्रंथसंपदा आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत असलेला तांत्रिक अभ्यासक्रम मराठी माध्यमात  करण्यासाठी मराठी विश्वकोशाने योगदान द्यावे असे सांगून मराठी विश्वकोश कार्यालयाने सुव्यवस्थित जतन केलेल्या विविध विषयावरील  संदर्भीय पुस्तकांच्या ग्रंथालयाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशचे सहायक सचिव, डॉ. शामकांत बा. देवरे यांनी सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाच्या कार्याची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!