स्थैर्य, मुंबई, दि.१४: मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलने सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेत उडी घेतली आहे. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वत:च लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल,असा सल्ला त्यांनी दिला.
१ महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत मराठा आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत.
२ गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता न्यायालयात आहे.गरीब मराठ्यांनी आता श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल.