
स्थैर्य, फलटण, दि. 26 सप्टेंबर : अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि अखंड मराठा समाज, फलटण तालुका यांच्या वतीने मदतफेळीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक हात मदतीचा, वारसा जपूया माणुसकीचा’ या शीर्षकांतर्गत ही मदत गोळा केली जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत यांनी दिली.
दि. २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत ही मदत स्वीकारली जाणार असून, जमा झालेले साहित्याचे किट दि. ३० सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना रोख स्वरूपात मदत न करता, वस्तूंच्या स्वरूपात (किट) मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दानशूर व्यक्तींनी आपल्या साहित्याचे किट खालील मराठा सेवकांकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागनिहाय संपर्क स्वयंसेवक:
- फलटण शहर:
- माऊली सावंत (९९६००४३७३३)
- विक्रमसिंह शितोळे (७७५६९१७७७७)
- यशवंत खलाटे-पाटील (९८२२९७३३४४)
- अक्षय तावरे (९७६६५१३१४३)
- अजय कदम (८०८७३११३४१)
- साखरवाडी विभाग:
- किरण भोसले (९८६०७२२४९७)
- विराज सतीश भोसले (७३८७१९२५२५)
- दीपक शिर्के (९८५००६२६२३)
- अमोल फडतरे (७५८८०६०९५१)
- फलटण-आसू रोड (पूर्व विभाग):
- निळकंठ धुमाळ (९६०४८०९८९१)
- विजयसिंह निंबाळकर (९६०४८८३९८९)
- मंगेश भांडवलकर (९४०४२४००६४)
- राहुल घाडगे (९६५७००८५०७)
- हनुमंत घाडगे (८३८०८१५९२७)
- फलटण-पंढरपूर रोड (पूर्व विभाग):
- युवराज ताटे (९९२१२७४१७६)
- अक्षय पवार (८२६१०३१०७१)
- सचिन जाधव (९८३४३५२२७३)
- फलटण-दहिवडी/शिंगणापूर रोड:
- रोहित मुळीक (७०२८११७२७२)
- फलटण-आदर्की रोड (पश्चिम विभाग):
- रामचंद्र सपकाळ (९८५०१३०८८०)
- विठ्ठल शिंदे (९७६३१३४०५७)
- फलटण-उपळवे रोड (दक्षिण विभाग):
- महेंद्र गोळे (९०७५७३३९९९)
- फलटण-लोणंद रोड (पश्चिम विभाग):
- आकाश धुमाळ (८६००२३९४९८)
- पृथ्वीराज गायकवाड (९८९०६८०२८२)
- जीवन भोईटे (९८५००४२०५७)
- सुधीर कराळे (९७६६७८५१६४)
- गोरख शिंदे (८९७५७१०७२८)
- निरगुडी, धुमाळवाडी, गिरवी परिसर:
- शरद पवार (७०१८३७६६२६)