
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । बारामती । अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती… आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी आलेल्या कृषीदूतांनी ढवळ ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणार्या ढवळ गावचा हुबेहूब नकाशा चक्क रांगोळीतुन रेखाटल्याने गावाकर्यांनी त्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयाच्या वेदांत भापकर, विश्वास कोळपे, अथर्व कुंभार, शिवराज लकडे, निखिल निमसे, आयुष फराटे, सार्थक भगत , यश भोसले हे कृषीदूत ग्रामीण कृषी
कार्यानुभव उपक्रमांतर्गत ढवळ येथे तीन महिने मुक्कामी आहेत. कृषी कार्यानुभव अंतर्गत सुरु असलेल्या अनेक प्रयोगांनी व प्रत्यक्षिकांनी येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम हे कृषीदूत करत आहेत.
या कृषीदूतांना संस्थेचे प्राचार्य. प्रा.एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या कृषीदूतांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन ग्रामीण कृषी जागरूकतेविषयी मार्गदर्शन करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल? माती परीक्षण, पाणी व्यवस्थापण, कीड नियंत्रण, पीक संरक्षण याबाबत माहिती देऊन शेतकर्यांना आधुनिकतेची कास धरायला प्रवृत्त करत आहेत. यावेळी जि.प. शाळेचे शिक्षक व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.