पुरपरिस्थितीमुळे फलटण तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी केले होते बंद;

वाचा नक्की काणते रस्ते केले होते बंद


दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज व रेड अर्लट जारी करण्यात आला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे फलटण तालुक्यात अतिवृष्टिमुळे अनेक गावांचे संपर्क तुटत प्रमुख रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामधील अजुनही काही रस्ते बंद आहेत तर काही रस्ते हे सुरु करण्यात आले आहेत.

फलटण शहरामधुन बाणगंगा नदी वाहत आहे. त्याठिकाणी असणारे सर्व पुल (पुणे व सातारा रोड वगळता) हे पाण्याखाली गेल्याने सदरील रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

जिंती – साखरवाडी – बडेखान – नांदल – बिबी – वाघोशी – ताथवडे – उपळवे – दर्‍याचीवाडी – बोडकेवाडी – गिरवी हा रस्ता बंद करण्यात आला होता.

पाडेगाव – रावडी – मुरुम – होळ -जिंती – सोमंथळी – सांगवी – सरडे – गोखळी – आसु हा रस्ता बंद करण्यात आला होता.

गिरवी – मांडवखडक – वाखरी – मिरगाव – निंभोरे – फडतरवाडी – जिंती – कोर्‍हाळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.

मुरुम – पिंपळवाडी – साखवाडी हा रस्ता बंद करण्यात आला होता.

जिंती – फलटण – निरगुडी – गिरवी – वारुगड – तोंडले – मलवडी – निढळ – भुरकरवाडी – कुरवली – औंध हा रस्ता बंद करण्यात आला होता.

नांदल – सुरवडी – पिंपळवाडी – होळ हा रस्ता बंद करण्यात आला होता.

फडतरवाडी – सोंमथळी (जुनी रेल्वे लाईन) हा रस्ता बंद करण्यात आला होता.

पाडेगाव – रावडी – मुरुम – होळ – जिंती – सोमंथळी – सांगवी – सरडे – गोखळी – आसु हा रस्ता बंद करण्यात आला होता.

फलटण – आसु ते तावशी (सातारा जिल्हा हद्द) हा रस्ता बंद करण्यात आला होता.

सासकल – भाडळी बु.॥ – सोनवडी – विडणी – सांगवी हा रस्ता बंद करण्यात आला होता.

फडतरवाडी ते सोमंथळी (जुनी रेल्वे लाईन) हा रस्ता बंद करण्यात आला होता.

फलटण – शिंगणापुर – म्हसवड – शेणवडी (सातारा जिल्हा हद्द) हा रस्ता बंद करण्यात आला होता.

दुधेबावी – तिरकवाडी – सोनवडी बु.॥ – विडणी – राजाळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.

जिंती – साखरवाडी – बडेखान – नांदल – बिबी – वाघोशी – ताथवडे – उपळवे – दर्‍याचीवाडी – बोडकेवाडी – गिरवी हा रस्ता बंद करण्यात आला होता.

गिरवी – मांडवखडक – वाखरी – मिरगाव – निंभोरे – फडतरवाडी – जिंती – कार्‍हाळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.

फलटण तालुक्यातील वरील प्रमुख रस्त्यांच्यासह अन्य काही रस्ते सुध्दा पुरपरिस्थितीमुळे बंद करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!