मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने अनेकांची ऑनलाईन कामे खोळंबली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणुन तापोळा बामणोली विभागाची ओळख असुन या विभागात आजच्या डिजीटल युगात मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने अनेकांची ऑनलाईन कामे खोळबली असुन मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा ऊडाला आहे रेंज विना विभाग संपर्कहिन होत आहे BSNLच्या टॉवरची असुन अडचण नसुन खोळंबा अशी गत झाली असुन BSNL कंपनीचे अधिकारी जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत

बामणोली तापोळा विभागात BSNL कंपनीचा फक्त टॉवर असुन अन्य कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा टॉवर नाही त्यामुळे ग्राहकांना BsNL कंपनीवरच आवलंबुन राहवे लागत असुन या टॉवरची वारंवार रेंजच गायब होत असल्याने कांदाटी सोळसी कोयना बामणोली विभागातील जनता त्रस्त झाली आहे.

कोरोना संकटामुळे चाकरमानी गावी असल्याने त्यांची ऑफीसची कामे ऑनलाईन घरूनच करण्यासाठी सुरु आहेत मात्र रेंज वारंवार खंडीत होत असल्याने त्यांना ऑनलाईन कामंही करता येत नाही त्यामुळे त्यांच्या हाताचा हाक्काचा रोजगार जाण्याची भिती निर्माण झाली असुन शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले असुन रेंज व नेट विना मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचा या विभागात फज्जा उडाला आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आणि जावली तालुक्याच्या तापोळा बामणोली भागावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे त्यामुळे जगभरातील पर्यटक या परिसरात मोठया संख्येने पर्यटनासाठी येत असतात. 

रस्ते, दवाखाने, वीज ,पाणी मोबईल रेंज या प्रमुख समस्या आजही स्वातंत्र्यानंतर ७० वर्षानीही सुटल्या नाहीत

आजचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. अगदी घरबसल्या जीवनावश्यक वस्तू मिळवणे किंवा अन्य सेवा उपभोगणे अशा सोयी इंटरनेटच्या माध्यमातून माणूस वापरत आहे. अशा या युगात कोयना भाग मात्र मोबाईल रेंज व सोईसुविधे पासून वंचित आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!