बहुजनांनो! आरक्षण टिकवण्यास एकत्र या : बापूसाहेब भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, शिरवळ, दि.२७: संविधानाने दिलेली आरक्षणे अबाधित ठेऊनच इतर समाजातील आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला, तरच सामाजिक समतोल राखला जाईल. बहुजनांनी आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र यावे. नऊ डिसेंबरच्या मोर्चास सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी केले.

शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे बहुजन हक्क समिती व इतर समाज संघटनांनी आयोजिलेल्या बहुजन आरक्षण बचाव संवाद बैठकीत ते बोलत होते. या वेळी सर्व राजकीय पक्षातील बहुजन समाजातील नेते व्यासपीठावर एकत्र आले होते.

श्री. भुजबळ म्हणाले, “”संविधानाने बहुजनांना दिलेले आरक्षण आजही कायद्याने कायम आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील आरक्षणासाठी अनेक घटकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपले आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बहुजन समाजातील सर्व अठरापगड जातीतील लोकांचे हक्क अबाधित राहावेत व त्यांच्या सवलती कायम राहाव्यात, यासाठी 9 डिसेंबरच्या मोर्चाच्या नियोजन खंडाळा तालुक्‍यात अतिशय कौशल्य पूर्ण केले आहे.”

राज्यात आजही कोरोना रुग्णांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त, मृत्यू संख्येत मात्र घट

याप्रसंगी राजेंद्र नेवसे, रामदास काबंळे, प्रदीप माने, संदीप नेवसे, नामदेव लोहार व प्रदीप क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. दरम्यान, खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीमार्फत 9 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पारगाव-खंडाळा एसटी स्टॅंड ते खंडाळा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!