दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | दुधेबावी ता.फलटण येथील सुखदेव सोनवलकर, रोहिदास सोनवलकर, सौ.वर्षाताई सोनवलकर, श्रीरंग सोनवलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते सह्याद्री कदम, पंचायत समिती माजी सदस्य सचिन रणवरे, बाबुतात्या नाळे, मोहनराव डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला, त्यानिमित्ताने सर्वांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे; अश्या सूचना श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी दिल्या.