जिल्हास्तरतीय सफाई कामगारांच्या समितीवर मनोज मारुडा यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 29 मार्च 2025। फलटण । अ. भा. स. म. काँग्रेसचे अध्यक्ष यांची मनोज मारुडा यांची हाताने मैला उचलणार्‍या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन जिल्हास्तरीय सदस्यपदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, पुणे विभागीय अ. भा. स. म. काँग्रेस व जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय राजू मारुडा यांनी श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगर परिषदचे पाटील, उपमुख्याधिकारी जमदाडे, आरोग्य विभाग आस्थापनाचे पी. के. तुळशे, स्वच्छता निरीक्षक नितीन वाळा, वसुली विभाग ाचे आनंद डांगे, मुकादम संघटनेचे रमेश वाघेला, उपाध्यक्ष लखन डांगे, महामंत्री निखिल वाळा, खजिनदार सारंग गलीयल, सहखजिनदार सुरेश मारुडा, परमित डांगे, चंदूभाई मारुडा, अनिल डांगे, विनोद मारुडा, सुरज मारुडा, अजय मारुडा, रोहित मारुडा, गोपाळ वाघेला, श्रीमती माया मारुडा, श्रीमती ज्योती वाळा, सौ.मिनल डांगे, शितल वाळा, नगरपरिषदचे अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडीबद्दल मनोज मारुडा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!