जरांगे – पाटीलांचा फलटण विधानसभेला उमेदवार नाही; नावाचा गैरवापर केल्यास त्या उमेदवारांना जागा दाखवणार!


दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चा म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही आरक्षित असल्याने या ठिकाणी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला नसल्याची माहिती फलटण येथील मराठा सेवकांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले कि; होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुवासाहेब हुंबरे व राजेंद्र पाटोळे यांनी फलटण विधानसभेतून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रतिज्ञापत्र दिले होते. परंतु त्यावर कोणताही निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला नाही. येत्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील हे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने मराठा क्रांती मोर्चा किंवा मनोज जरांगे – पाटील यांच्या नावाचा वापर केला तर सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याचा बुरखा फाडत त्याला त्याची जागा दाखवण्यात येईल; असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याचे विविध मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!