दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑक्टोबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांची काही दिवसांपूर्वी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली होती. या नियुक्तीनंतर पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये माणिकराव सोनवलकर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते लक्ष्मण सोनवलकर यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माणिकराव सोनवलकर म्हणाले की; भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह कृष्णा खोऱ्याच्या अखत्यारीत असणाऱ्या तालुक्यांमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ न देता आम्ही योजना राबवणार आहोत.