दैनिक स्थैर्य | 09 ऑक्टोबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकपदी वर्णी लागली असून याबाबतचा शाशन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी माणिकराव सोनवलकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला नक्कीच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत दैनिक “स्थैर्य”ने “वृत्त प्रकाशित केले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले असून “स्थैर्य”च्या विश्वासर्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
नक्की कोण आहेत माणिकराव सोनवलकर ?
माणिकराव सोनवलकर यांनी सन १९८९ साली डी. के. कोकरे यांच्या नेतृत्वात असणाऱ्या यशवंत सेनेची राज्यातील दुसरी शाखा सुरु केली. तेंव्हापासून माणिकराव सोनवलकर समाजकारण व राजकारणामध्ये सक्रिय आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती सदस्य ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
-
1989 – “यशवंत सेनेची” राज्यातील दुसरी शाखा दुधेबावी येथून सुरवात.
-
1991 – श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात राजे गटात प्रवेश.
-
1992 – माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांची पंचायत समिती सदस्य पदी वर्णी.
-
2002 – माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांची पंचायत समिती सदस्य पदी वर्णी.
-
2007 – दुधेबावी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड (२०२२ अखेर चेअरमन म्हणून कार्यरत).
-
2012 – जिल्हा परिषद सदस्य पदी निवड.
-
2012 – जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड.
-
2012 – जिल्हा परिषदेच्या शिक्षण, अर्थ व समाजकल्याण विभागाच्या समिती सदस्य पदी निवड.
-
2014 – जिल्हा परिषद अध्यक्ष पदी निवड. (राज्यमंत्री दर्जा) (२०१६ अखेर)
-
2017 – माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांची जिल्हा परिषद सदस्या पदी निवड.
-
2023 – माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांची दुधेबावी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी निवड.
-
12 ऑगस्ट 2024 – माजी खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश.
-
09 ऑक्टोबर 2024 – कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड (राज्यमंत्री दर्जा).
यासोबतच जुलै 1994 पासून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध प्रशालेत उपशिक्षक म्हणून माणिकराव सोनवलकर हे अद्याप कार्यरत आहेत.