दुधेबावी येथे कृषीदूतांनी दिले आंबा कलम बांधणी प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी शेतकर्‍यांना आंबा कलम भरण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे.

ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत दुधेबावी येथील शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी तसेच उच्चप्रतीचे आंबा रोप आर्थिकदृष्ट्या परवडणारे व सहज पद्धतीने तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

यामध्ये साधारण २१ दिवसांच्या रोपाला उच्चप्रतीच्या हव्या त्या वाणाच्या आंब्याचे कलम शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळे काप देऊन बांधले जाते. प्रात्यक्षिकाला शेतकर्‍यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीशा पंडित तसेच विषय विशेषज्ञ प्रा. आडत सर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृषीदूत राजवर्धन दराडे, यश भोसले, संकेत तावरे, रोहित शिंदे, दिग्विजय फाळके, शिवम मेनकुदळे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!