
दैनिक स्थैर्य । 30 जुलै 2025 । फलटण । तिरकवाडी येथील मंगेश जयसिंग पवार यांचा गंभीर पुण्यातील आरोपींना अटक करणे व अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षाच्या मुलीला सुखरूप पकडून दिल्याची यशस्वी कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडून गौरविण्यात आले आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी पुणे शहर परिसरामध्ये पारधी समाजातील लहान मुलीचे अपहरण झाल होते. या मुलीचा अपहरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखने करून संशयित आरोपी गजाआड केले.
तिरकवाडी येथील मंगेश पवार हे 2008 साली पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झाले. त्यानंतर अकोला या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे शहर पोलीस दलामध्ये आपली सेवा सुरू केली. प्रथम नियुक्ती त्यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम केले. त्यानंतर त्यांची बदली पुणे क्राईम ब्रँच या ठिकाणी सेवा केली. सध्या ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस हवालदार या पदावर काम करत आहेत.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे राजेश बनसोडेे, अपर पोलीस आयुक्त निखील पिंगळेे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी अभिनंदन केले आहे.
पारधी समाजातर्फे पेढे वाटप
पारधी समाजाच्या दाम्पत्यांनी आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली म्हणून पारधी समाजातर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व परिसरामध्ये पाच किलो पेढे वाटून आनंद व्यक्त केला. व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्यांचे आभार मानले.