माणगंगा जलसंवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “चला जाणुया नदीला” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज कुळकजाई येथील सीतामाई मंदिरापासून माणगंगा नदीच्या संवाद यात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, नदी सन्मवयक वैजिनाथ घोंगडे, डॉ. माधव पोळं, अजित पवार, रुपेश कदम, जलसंपदा विभागाचे अधिकारी विकास बनसोडे, गौरव पाडवी व कर्मचारी तसेच कुळकजाई सरपंच विक्रम जगताप, ग्रामपंचायत सदस्य, महिला, प्राथमिक शाळा  शिक्षक व विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी नदी समन्वयकांनी तसेच प्रांताधिकारी श्री. सूर्यवंशी, जलसंवाद यात्रेबद्दल मार्गदर्शन केले. नदी संवाद यात्रा शुभारंभ अभियानाची प्रस्तावना  विकास बनसोडे यांनी केली व वन अधिकारी  मुळे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!