दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । फलटण । मानेवाडी ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलची सत्ता आली असून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज सरपंच राजेंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
फलटण तालुक्यात 24 ग्रामपंचायतच्या निवडणूका लागल्या असून मानेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
यावेळी राजेंद्र शामराव जाधव सरपंच दत्तात्रय गणपत मोरे, रवींद्र महादेव शेडगे, मंगल राजेंद्र जाधव, अंकिता किसन साळुंखे हे सदस्य उपस्थित होते.
गेली पंधरा वर्षे मानेवाडी ग्रामपंचायत माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारावर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व नेतृत्वाखाली काम करणारी ग्रामपंचायत असून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही ती काम करेल, असे नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
काही लोकांनी चहा पिण्याच्या निमित्ताने इकडे तिकडे नेण्याचा प्रयत्न केला पण आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानदेव नाना साळुंखे, राजेंद्र बबन खराडे, विश्वास गणपत मोरे, बाबुराव नानासो मोरे राजेंद्र मोरे बाळासाहेब शेडगे, किसन साळुंखे, बापू जाधव तानाजी शेडगे अभिजीत घाडगे संजय शेडगे,राजेंद्र शेडगे, मोहन जगताप मोहन कदम संदीप जाधव निलेश मोरे, आकाश मोरे संजय घाडगे गौरव खराडे मनोज कदम, आदी गावातील नागरिक उपस्थित होते.