
स्थैर्य, दहिवडी, दि.२२: ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत प्रभाव पहाता रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. फुल ना फुलांची पाखळी या उक्तीप्रमाणे माण तालुक्यातीलमाणदेश प्राथमिक शिक्षक मंच , माण तालुका दहिवडी विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोविड 19 वर मात करण्यासाठी माण तालुक्यातील सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या आरोग्य सेवेसाठी जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्सिंग च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून, जम्बो ऑक्सिजन सिलेंडरच्या वितरणाचा छोटेखानी लोकार्पण सोहळा माण -खटाव प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे,माण तहसीलदार बाई माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी, माण तालुका गटविकासाधिकारी गोरख शेलार, सहाय्यक गटविकासाधिकारी.भरत चौगले,दहिवडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,माण तालुका वैद्यकीय आरोग्याधिकारी लक्ष्मण कोडलकर ,ग्रामीण रुग्णालय गोंदवलेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किसन कदम, माणतालुका गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते मॅडम, भाग शिक्षण विस्ताराधिकारी .संगिता गायकवाड , केंद्रप्रमुख नारायण आवळे,अंकुश शिंदे माणदेश प्राथमिक शिक्षक मंच मधील दहिवडी भागातील अनेक शिक्षक बंधू भगिनी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.