स्थैर्य, म्हसवड : दोन वर्षापासुन आपण पहात असलेल्या स्वप्नाची पुर्ततेकडे वाटचाल सुरु झाली असुन लवकरच आपले स्वप्न सत्यात उतरुण माण तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील युवकांसाठी आदर्शवद असे ग्रंथालय उभारले जाणार असुन सदरचे ग्रंथालय हे वाचकांसाठी एक पर्वणी ठरेल असे विचार माणदेशी चँपीयनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यातील माणदेशी तरुणासाठी पहिल्या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाचे भूमिपूजन म्हसवड येथील मेगा सिटी येथे माणदेशी फौंडेशन संस्थेच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांचे प्रमुख उपस्थित व २०१९ च्या एमपीएससी मधील बेस्ट स्टूडंट विजय पिसे यांच्या वयोवृद्ध मातोश्री श्रीमती विमल पिसे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रभात सिन्हा बोलत होते.या कार्यक्रमास दूरदर्शनचे सुनील कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा व जवाहर देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी करोनाच्या पार्शभूमीवर सोशल डीस्टन्स राखत कार्यक्रम पार पाडला. यावेळी पुढे बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले की या ग्रंथालयाच्या जडणघडण मध्ये माझे बंधू करण सिन्हा यांचा सिंहाचा वाट आहे. करण सिन्हा हे उच्च क्षिक्षणा निमित्ताने अमेरिकेत असूनही आपल्या भागातील आपल्या मातीतल्या सवंगड्या साठी जे करता येईल तो प्रयत्न त्यांचा सतत चालू असतो. खर तर या ग्रंथालयाची संकल्पना हि मूळ चेतना सिन्हा यांची परंतू खा. हुसेन दलवाई यांच्या मदतीतून हे कार्य पूर्णत्वास जात आहे शिवाय याचा ख-या अर्थाने पाठपुरावा करण सिन्हा यांनी केला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
यावेळी बोलताना श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या खासदार हुसेन दलवाई यांच्या मदतीतून व करण सिन्हा यांच्या कल्पनेतून म्हसवड मध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुसज्य ग्रंथालय लवकरच सुरु करण्यात येत आहे. या ग्रंथालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्यास मोलाची मदत होणार आहे. ग्रंथालयामुळे वाचनीय साहित्य मिळते व वाचनाने नाविन्यपूर्ण युवा पिढी घडते. आजकालच्या तरुणा मध्ये मोबाईल एेवजी ग्रंथाची गोडी निर्माण झाल्यास हाच तरूण उद्याचे भविष्य घडवणार आहे आणि म्हणूनच माणदेशी संस्थेचा छोटासा प्रयत्न आहे.
युवकांसाठी नाविन्यपूर्ण ग्रंथालयाचे भूमिपूजन आज होत असून या ग्रंथालयासाठी गेले दोन वर्ष सतत पाठ पुरावा केला आहे आज या आधुनिक ग्रंथालयाच भूमिपूजन करण्यात येत आहे. शिवाय कालच छत्रपती शाहू महाराजांची जयंती व ह्या ग्रंथालयाची स्थापना हा एक योगा योगच म्हणावा लागेल. माझं सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड असते, हे ग्रंथालय तर फक्त सुरावात आहे. माझ्या माणदेशी मातीला जेवढं देईन तेवढं कमीच आहे ह्या माती ने हजारो रत्न दिले आहेत आणि माझं काम आहे की मी ह्या माण देशाला परत देण असे हजारो रत्न ह्या ग्रंथालयातून घडो ही आशा व अपेक्षा असल्याचे शेवटी त्या म्हणाल्या. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यास सारंग नावळे, श्रीकांत पतंगे, अक्षय पोळ व करण सिन्हा मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.