माणदेशी बँकेने सुरु केली नवी पोर्टल योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, म्हसवड दि.४ : माणदेशी महिला सहकारी बॅंकेचे बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टिम) पोर्टल सुरु” माणदेशी महिला सहकारी बॅंकेने बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टिम) पोर्टल सिस्टिमची नुकतीच सुरुवात केली आहे या माध्यमातून सर्व प्रकारची बिले भरण्याची सुविधा त्याचबरोबर व्हीएएस (Value Added Services) मोबाईल अॅप द्वारे कोणताही मोबाईल रिचार्ज अथवा डी टी एच रिचार्ज करता येणार असल्याबाबतची माहिती बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखाताई कुलकर्णी यांनी दिली.

याबाबतची माहिती देताना सौ. कुलकर्णी मॅडम म्हणाल्या आज डिजिटल युगात माणदेशी महिला सहकारी बॅंक हि पाठीमागे नसून यामध्ये आपल्या सर्व गामिण ग्राहकांना मंथली बिल भरणे सोपे जावे म्हणून बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टिम) पोर्टल ची सुरुवात केली आहे शिवाय VAS (Value Added Services ) हे मोबाईल अॅप सुद्धा सुरु करण्यात आले आहे. 

या माध्यमातून ग्राहकांना लाईट बिल, फोन बिल, पाणीपट्टी व घरपट्टी  यासारखी सर्व बिले भरणे सोपे जाणार आहे शिवाय कोणत्याही व्यक्तीला माणदेशी बँकेत येऊन या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. हि सुविधा माणदेशीच्या म्हसवड शाखेसह गोंदवले, दहिवडी, वडूज, लोणंद, सातारा, धायरी-पुणे व कामोठे –मुंबई या ठिकाणच्या शाखामधून  सर्वच ग्राहकांना घेता येणार आहे.

या सर्व सुविधाचा लाभ बॅंकेच्या ग्राहकां बरोबर इतर कोणत्याही बाह्य ग्राहकाना सुद्धा घेता येणार आहे. खातेधारका व्यतीरीक्त इतर ग्राहक सुद्धा बिल कॅश मध्ये भरू शकणार आहेत. शिवाय VAS सर्व्हिस च्या माध्यमातून माणदेशी बँकेच्या खातेदाराला मोबाइल बँकिंग अँप द्वारे आता सर्व मोबाईल रिचार्ज , डी टी एच रिचार्ज घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून करता येणार आहे.

याउपरोक्त मोबाईल बँकिंग सुविधा बरोबरच IMPS फंड ट्रान्सफर सुविधा, RTGS NEFT सुविधा, CTS क्लिअरिंग सुविधा, इ कॉमर्स ऑनलाईन सुविधा, POS व्यवहार सुविधा, Any ब्रँच बँकिंग सुविधा याप्रकारच्या सर्व सुविधा माणदेशी महिला बॅक आपल्या ग्राहकांना देत आहे.

ग्रामीण भागात अशा प्रकारच्या सर्व बॅकिंग सुविधा देणारी पहिलीच माणदेशी महिला सहकारी बॅंके असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर या सर्व सेवा सुविधा माणदेशीच्या म्हसवड, गोंदवले, दहिवडी, वडूज, लोणंद, सातारा, धायरी-पुणे व कामोठे –मुंबई या ठिकाणच्या शाखामधून सर्वच ग्राहकांना घेता येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!