दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय 5 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेत असतील अशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करुन सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही. सन 2021-22 आणि त्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या-त्या वेळचे प्रचलित नियम लागू राहतील.